विचार
विचार
विचार करून करून मेले लोक सांगा काय कमावले
वाईट चिंतित सदैव याचं कसं होईल भले
प्रगती करणाऱ्याच्या कामात टांगा अडवल्या
आयुष्यभर उणिवा त्यांच्या काळत बसल्या
शेजाऱ्याची प्रगती याचा पोट दुखते
कसं वाईट होईल बारा भानगडया करते
काय मानसिकता झाली पहा पडताळून
उच्च विचार सांगून वैद्य जातील मरुन.