STORYMIRROR

Rajesh Varhade

Comedy

3  

Rajesh Varhade

Comedy

शब्द सुमने देवा

शब्द सुमने देवा

1 min
111

शब्दसुमने देवा विठ्ठला 

ठेवतो तुझ्या चरणाशी 

वारी आषाढी कार्तिकी 

धरींन नित्य एकादशी


व्रत करीन दुसऱ्यांना 

तुझी महती सांगून 

संतांनी जिवो उद्धरिला 

मनोभावे भक्ती करून


भाव माझ्या हृदयीचा 

जाणून घे बा विठ्ठला 

संसारी दुखी होऊन 

सर्वजण पछाडला


नाही सुख संसारात 

कडून चुकले सर्वांना 

मन लागले चरणाशी 

भटकुन पंढरी ये दर्शना


माझे शब्दसुमणे 

व्यथा माझी ऐकूण 

कर्ममुक्त कर दुःख बिमारी 

आणि संसार व्यसनातून.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy