वेग
वेग
1 min
179
वेग मर्यादित असावा
सदैव वाहनाला
मानवी कर्माला
नसावे थांबायला
संयमाने कामे करता
सुरळीत होतील
घाई गडबडीत कामे
व्यर्थ अपव्यय जाईल
श्वासांना वेग येतो
कसरतीने व्यायामाने
शरीर सुदृढ राहते
नियमित हातच्या कर्माने
का थांबवावी व्यवहार
कार्य करण्याची क्षमता
पटापट शेतीचे घामाचे
कामे जर होता होता
परंतु कागदी व्यवहार
विचारपूर्वक सावकाश
मेहनती पुरते ठेवावे
आपले मोकळे आकाश
