नवीन वर्ष
नवीन वर्ष
शीर्षक नवीन वर्ष
संपता अंधकारमुळे
जुन्या वर्षाची संध्याकाळ
आरंभ नव्या युगाचा
आशेचा किरण सकाळ
झाले गेले विसरून
जावे पुढे पुढे चालावे
सत्कर्म परमात्म्याला
दिवसातून एक वेळ भजावे
तोच येईल नावेत
बसलो जीवनाच्या
सुखदुःखाच्या पलीकडे
डोळ्यातून सर्वांच्या
नवीन वर्ष नवीन
संकल्प नव्या युगाचा
मार्ग संधी एक वेळ
पुढे पुढे जाण्याचा
मागच्या वर्षात राहिलेले
कामे तातडीने पूर्ण करणे
सर्वांशी मिळून मिसळून
सद्भावनेने वागणे
राजेश लक्षमण वऱ्हाडे
रा कसुरा ता बाळापूर जि अकोला
