आई
आई
1 min
4
मी होतो जेव्हा पोटात
किती कळ सोसल्या
सांभाळून पाऊल
चालताना टाकल्या
किती केले संस्कार
कसे विसरावे त्याला
आद्य गुरु होऊन होती
आई तयार सांभाळायला
कसा विसरावे तुला
रात्र रात्र जागलीस
बिमारीत दचुकून उठता
हृदयी कवटाळलीस
माझ्यावरले वार तू
वेळोवेळी झेलले माते
लाड आणि कौतुकांने आई
सर्वा स्तुती माझी सांगते
मातोश्री सर्वश्री आहे
माझ्या आयुष्यात
कोण जाणे काय होईल
माझ तिच्या पश्चात.
