STORYMIRROR

Rajesh Varhade

Abstract

3  

Rajesh Varhade

Abstract

नवरात्री

नवरात्री

1 min
153

नवरात्री नऊ रंग 

शैलपुत्री पहिला दिवस 

पांढरा रंग शांत करा 

सराव आभास


दुसरा दिवस ब्रह्मचारीनी

लाल रंग प्रेमाचा 

 तिला आवडते फार

सोहळा भक्तांचा


नारंगी रंग चंद्र घंटा 

तिसरा तिला न विसरा 

सकारात्मक ऊर्जा 

करते मानवा सारा


पिवळ्या रंगाचा कुष्मांडा 

रंग पिवळ्या रंगात 

आराधना भक्ता सर्व 

पूजनात करतात


पाचवा दिवस स्कंदमाता 

दुर्गा अवतार आहे 

तिच्या उपासनेचा 

रंग हिरवाच राहे


सहावा कात्यायनी 

करडा वाईटस संपवण्या 

काल रात्री सातवा 

धैर्याने जागणे


जांभळा रंग आहे 

महालक्ष्मी अष्टमीला असतो 

सिद्धधात्री नववा नऊ 

दिवसाची सांगता घेतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract