STORYMIRROR

Rajesh Varhade

Abstract

3  

Rajesh Varhade

Abstract

लक्ष्मीपूजनाचा दिन

लक्ष्मीपूजनाचा दिन

1 min
144

उजळला आसमंत 

सारा ज्योतीने प्रकाशला 

चहुकडे आकाश येईल 

सर्व उधाण आनंदाला


लक्ष्मीपूजनाचा दिन 

आनंद दे मनाला 

लहान मोठ्या हर्ष 

सुरूंग फटाक्याला


फराळाचे सामान 

नाना प्रकारची तयार 

नवेनवीन कपडे फळ

प्रसाद नाना प्रकार


झंडूच्या फुलांचा माळा

घमघमीत सुगंध त्याला 

सुगंधी उटणे अभ्यंग 

स्नान सज्ज करायला


फराळ वाटु सर्वांना 

एकमेका सन्मानाला 

भाऊबंद शेजारधर्म 

नातेगोते स्वीकारायला


गगनात मावेनासा 

आनंद सांगायला 

तोरण आंब्याचे सदैव 

सुशोभित दाराला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract