पिंजरा अपराधांचा !!!
पिंजरा अपराधांचा !!!
आरोपांची गुरुकिल्ली त्याला सापडली होती,
काळ्या विचारांनी भ्रष्ट मती झाली होती..
सत्य असत्य फिरवण्याची कला अवगत होती,
माणुसकीला झुकवणारी काळी प्रतिमा बनत होती..
लोकांमध्ये विद्रुप चेहरा हा विश्वासाने वावरत होता,
गुन्ह्यांचा प्रदूषित समुद्र, आता भरती घेत होता..
काळ्या लाटा उसळत होत्या सहनशक्ती च्या कडा,
दिव्य झाला प्रकाश अन कुबुद्धी चा अंत आला ..
स्त्री शक्ती चा पुनर्जन्म अन सन्मानाचा जागर झाला,
अश्या प्रकारे त्या विषमुद्रेचा शेवट घातक झाला..
मानवा कर निर्धार मनाचा !!
पिंजरा असावा बंद अपराधांचा..!!!
