मोह
मोह
झाला त्याला गरिबीचा स्पर्श
म्हणूनी केला त्यानं खूप संघर्ष
नाही केली कुणाचीही चाकरी
पण मिळवली शेवटी प्रशासकीय नोकरी
गेल्याच वर्षी झाला मोठा अधिकारी
पैशाचा मोह त्याला भारी
म्हणून मागितली यंदा 40000 रू.ची लाच
उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागानं दाखवली त्याला टाच
पकडूनी रंगेहाथ
नोकरीने सोडली त्यामुळे त्याची साथ
बाळगला असता समाधान
तर गरिबांपुढे वाढला असता त्याचा मान
म्हणूनी नका करू कधीही हाव
नाहीतर कधी ना कधी उतरेल तुमचा भाव
