STORYMIRROR

Sachin Arun Londhe

Tragedy Crime

3  

Sachin Arun Londhe

Tragedy Crime

बलात्कार

बलात्कार

1 min
86

आई आज तुला 

शेवटचं पाहू दे

तुझ्या प्रेमळ स्पर्शाचा

आनंद आज घेऊ दे


संघर्ष माझा आई

आज संपत आहे

जाता जाता आई तुला 

एक प्रश्न विचारू का?


जगणं हे स्त्रियांचं 

असंच असतं का?

सन्मान हा स्त्रियांना

कधीच मिळणार नाही का?


होतात अत्याचार स्त्रियांवर किती

झाले किती बलात्कार 

करून सहन सारं काही 

असंच आम्ही मरायचं का?


माझंसुद्धा स्वप्न होतं 

सुंदर आयुष्य जगायचं 

होऊन खूप मोठं 

तुझ्यासाठी जगायचं 


उमलण्यापूर्वीच कळीला 

आज खुड़ण्यात आले

जगणं सुरु होण्याआधी 

त्याला संपवण्यात आले 


गेल्यावर देवाकडे मी,

विचारेन त्या देवाला

जन्म हा स्त्रीचा,

का मला तू दिला

का मला तू दिला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy