STORYMIRROR

Sachin Arun Londhe

Tragedy

3  

Sachin Arun Londhe

Tragedy

पिंजरा

पिंजरा

1 min
272

पिंजरयातील एक पक्षी 

आज कैदमुक्त झाला

खुल्या आभाळी उडण्याचे

स्वप्न पाहू लागला 


खुल्या निळ्या आकाशात 

मनसोक्त उडू लागला

श्वास खरा मुक्तीचा 

तो अनुभऊ लागला 


डोळे मिटून गच्च तो

उंच झेपू लागला 

घेऊन स्पर्श वार्याचा 

तो मोहरू लागला 


ओळखीच्या शिट्टीने माञ

त्याचे डोळे अलगद ऊघड़ले

पुन्हा पिंजर्यात पाहून 

मन त्याचे हरवले...


खुल्या आभाळी उड़ण्याचे स्वप्न 

त्याचे स्वप्नातच राहिले... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy