जीणं
जीणं
उघड्या वरचं जीणं कसं
उघड्या वरती जगायचं
भूक लागलेल्या पोटाला
पाणी पिऊन भागवायचं
कधी चटके उन्हाचे
तर कधी बोचरी हवा
कधी कधी पाउस सुध्दा
आमची करत नाही दया
डोळे मिटून पडलेल्या देहाला
झोप काही लागत नाही
अन् अर्ध्या अर्ध्या भाकरी सुध्दा
याला काय पुरत नाही
अर्ध्या भाकरीत सुध्दा
खाणारी टाळकी चार असतात
नावा पुरता सुध्दा एक घास
पुर्ण मिळत नाही.
उघड्या वरच जीणं कसं
उघड्या वरच जगायचं
भूक लागलेल्या पोटाला
पाणी पिऊन भागवायचं....
