तात्काळ सेवा , एकटे मन
तात्काळ सेवा , एकटे मन
सेवेतून सेवा ,घडली
कोविड सेंटर मधील ,वास्तविकता कळली ॥1
केव्हा, कसे, कधी करावे ,सांत्वन
स्तब्ध झाले होते रे ,माझे मन ॥2
निशब्द मानवा कर ना ,जरा विचार
समुपदेशनातून तू दे त्यांना ,विवेकी ॥3
संवेदभावना, दाटून येत होत्या
दृश्य बघून ,मागे कधीच सरावल्या होत्या ॥4
मनोबल वाढविण्याचे ,मंत्र दिले तुम्हीं
जगण्यासाठी जगने ,शिकलो आम्हीं ॥5
सकारात्मकतेचे ,बीज पेरले गेले
निरागस मानवतेचे ,दर्शन झाले ॥6
*एकटे मन*
“आज कळले आहे ,मजला
नक्की जगने काय, असते ॥1
जो पर्यन्त तुमचे कोणी ,जात नाही
तो पर्यन्त त्याची तीव्रता ,समजत नाही ॥2
या महामारीने अंत:मनाला स्पर्श, केला खरा
झाला तुझ्या आणि माझ्यात ,दूरावा ॥3
काय चुकले होते ,माझे
सोसले संसाराचे ,ओझे ॥4
किती जपले मी, नात्याचे धागे
पण आयुष्याच्या डावात ,मीच राहीले रे मागे ॥5
गडद झाला काळा ढग,अर्ध्या वाटेवर
निराधार एकटे मना स्वीकारले ,मी त्या जागेवर ।6
