अश्रुंचे संदर्भ
अश्रुंचे संदर्भ
अश्रुंचे संदर्भ त्या,
शेतक-यास पुसावा.
जो प्रामाणिकपणे,
धरणीची करतो सेवा.
कष्टाचे मोल फोल झाले,
हे जेव्हा त्याला कळते.
त्या अश्रुंचा संदर्भ,
का अजून नाही फळते.
डोळ्या देखत पिकलेली शेती,
निशब्द श्वास सोडते.
तेव्हाच तो अर्धा मरतो.
अश्रुंचा संदर्भ लावत बसतो.
नियतीचा खेळ कुठे बहर,
तर कुठे दुष्काळाचा कहर.
सारे खेळ तो फक्त पहातो,
डोळे उघडे ठेवून समोर.
त्या शेतीवर जीव जडला,
लेकरू समजून प्रेम ही करतो.
डोळ्या देखत प्राण जाताना,
पाहतो, अन तेव्हाच तर मरतो.
तुझा सारखा प्रामाणिक आहे कोण?
प्राण तुझा आहे की अनमोल.
विसरूनीय नियतीचा खेळ,
पुन्हा उठ,अन पिकव मोती अनमोल.
