दिवसेंदिवस
दिवसेंदिवस
आई आणि बाबांची अहो
लाडाची एकुलती एक लेक
समाजामधे तिचे आहे स्थान
अतिशय उच्च आणि नेक....
लग्न झाले अगदी वेळेवर
पतीसमवेत मोदाने सासरी गेली
माहेरची संस्कारांची ही शिदोरी
फक्त तिच्याबरोबर तिने नेली....
सासुरात बाई सुखात नांदली
माहेराची ओढ जरा कमी झाली
पतीसमवेत संसाराची सारी स्वप्ने
पाहताना त्यातच ही रमायला लागली...
लग्नाला भुर्रकन झाली आठ वर्ष
दिवसा मागून दिवस जावू लागले
पोटी अजून बाळाची चाहूल नाही
सारे उपाय करून दोघेही थकले....
कधी कधी कितीही ठरवले तरीही
पण गर्भ रूजवणे हो सोपे नाही
समाजात "वांझ" पदवी नको बाई
असे विचार सतत डोकावून पाही...
समाज काय घरातीलही माणसे
त्यांची गरोदरपणाची बातमी लपवतात
त्यावेळी मनाला होणारी सल, दुःख
समाजाची वागणूक सांगून जातात...
केले सारे उपाय ,अगणित असे उपाय
काही कवाडं लेकीसाठी खरच खुलली
तिच्याही गर्भी फुटेल अंकूर देखणा
या विचारातच दोघेही मनी रमली...
दोघेही मनी रमली....
