रुपं
रुपं
1 min
546
रुप तिचे भासे जणू
जसे चांदणे नभात
तिला पाहताच क्षणी
मन माझे ना माझ्यात
कसें तिचे भासे जणू
दाट काळी गर्द रातं
हरवून जाउ त्यात
पाहतो त्याचीच मी वाट
ओठांवर तिच्या असे
नेहमी केसरी हो रंग
रवी मावळ्यावर जसा
नभी सोडतो हा रंग
हात कोवळा तिचा हा
घेतो हातात मी माझ्या
तुझे आहे कोणीतरी
भासे तिच्या स्पर्शातुनी
भाळी तिच्या असे
नेहमी चंद्राची हो कोरं
सुंदर दिसे रुप तिचे
लावी जिवाला हो घोरं
तिच्या प्रेमाळ कुशीत
मला निजावेसं वाटे
करुन डोळे बंद
इथे मरण हो यावे...
