*दळता दळता
*दळता दळता
दळता दळता दळुन दाणे
गावून गाणे तान्ह्युल्याशी
भुकं लागली घे मजला
बाळ विनवी आईशी
एक हाती खुटवळ
दुजा हात झोळीशी
थांब जरासा घडीभर बाळा
तवा तापतोय चुल्ह्याशी
शिजवून भाकर म्हणती गाणे
घेवून चटके हाताशी
रडता रडता निजले पोर
भुक घेवून उराशी
कंठ दाटुन आला तिचा
घेवून लेकरू पदराशी
दळता दळता दळून दाणे
गावून तान्ह्युल्याशी
