व्यसनाची बाटली...
व्यसनाची बाटली...
जीवन मरणाची भीती
इथे प्रत्येकाला आहे
गरीबाची रोटी तोडून
आदर थोडा सत्तेला आहे
विकासाचे नारे देता तुम्हीच
येता सत्ता हाती तुमच्या
दिलेली आश्वासने खरे पडतात कमीच
विकासाची दारे चालतील
जरी उशीरा उघडली
उद्ध्वस्त आताच नका करू
संसार मायमाऊलीचा
विकत घेता देऊन
बाप्यास व्यसनाची बाटली...
