STORYMIRROR

अभिजीत मस्कर

Tragedy Others

3  

अभिजीत मस्कर

Tragedy Others

आठवणीतील ती...

आठवणीतील ती...

1 min
313

आठवणीतली ती कधी

परतुनी येईल का,

तिची भासणारी उणीव

ती भरून काढेल का,


हृदयाचा तो कप्पा अजूनही

तसाच आहे तिच्यासाठी

तिच्याही मनात असेल का

जागा थोडी माझ्यासाठी


ती नाही पण तिची

आठवण मात्र रोज येते

तिच्यासाठी धडधडणाऱ्या माझ्या

हळव्या मनाला घायाळ करून जाते


माझ्या वेड्या मनाची 

साद ती ऐकून घेईल का

परतुनी ती कधी

माझ्यासाठी येईल का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy