STORYMIRROR

अभिजीत मस्कर

Tragedy

4  

अभिजीत मस्कर

Tragedy

माय बाप

माय बाप

1 min
602

खूप शिकून रे बाळा

गेलास घरापासून लांब

तू झालास मोठा साहेब

पण अजूनही गावाकडं

वाट बगती तुझं माय-बाप


तुझ्या शिक्षणापाई किती

खटाटोप घेतला

तू शिकावास म्हणून

चिमटा काढला पोटाला


बाप अजून फेडतो तुझ्या

शिक्षणाची सावकाराची उसनी

माझ्या अंगची जाता

जाईनात दुखणी


शेतमधी राब राबून मोडलं

माझं कंबर

एकदा येऊन खाऊन जा

मायच्या हातचं पिठलं-भाकर


तू नाहीस तर बाळा

घरपण नाही रे घराला

पण विसरू नको यायला

दहन द्यायला आमच्या सरणाला


मेल्यावर तर बगावयास

येऊन जा रे बाळा

नाहीतर पिंडाला आमच्या

शिवणार नाही कावळा

शेवटचं एकदाच बघायला

ये रे बाळा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy