STORYMIRROR

अभिजीत मस्कर

Others

3  

अभिजीत मस्कर

Others

ठाव लागेना...

ठाव लागेना...

1 min
270

सैरभैर मनाला या

ठाव कशाचा लागेना

शोधावं म्हटलं तरी 

हाती काहीच लागेनाा..


क्षणात इथं तर कधी तिथं

लगाम त्याला लागेना

जमा केल्या साऱ्या आठवणी

हृदयात मात्र मावेनात


गुरफटून गेलं आयुष्य सारं

 कोडं सुटता सुटेना 

शोधावी म्हटलं वाट नवी

दिशा मात्र उमगेना


भूतकाळात अडकलय सारं

नवी पहाटच उजडेेेना

जावं म्हटलं सगळं सोडून

पाय मात्र निघता निघेना


नवी पहाट उजडेल खरी

जखम मात्र ओलीच राहीली

प्रेमाचे रंग खूप उधळले

कहाणी मात्र अर्धवटच राहिली...


Rate this content
Log in