STORYMIRROR

अभिजीत मस्कर

Romance

4  

अभिजीत मस्कर

Romance

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
638

आहे एक परी

थोडीशी लाजरी, थोडीशी बावरी

तरीही माझ्या मनाला हवी असणारी


खूप प्रेम आहे माझं तिच्यावर

आणि तिचंही तितकंच माझ्यावर

पण दोघांनीही बोट ठेवले होते तोंडावर

आणि ठेवला होता दगड मनावर


तिच्याही मनात तेच होते

जे होते माझ्या मनात

पण दोघांच्याही कंठातून

शब्द बाहेर यायला घाबरत होते


खरं तर तिच्यावर प्रेम करतो

अगदी लहानपणापासूनच

शाळेत तिच्या बाजूला तेव्हापासून


खूप काळ लोटून गेला

तरीही दोघांची मने अबोलच

परत मनामध्ये तोच विचार आला

आणि त्याच भावना काळजात

रुतून बसल्या होत्या सखोल


आता मात्र ठरवलं होतं

दोघांच्याही मनाने

एकत्र यायचं आहे दोघांनी आयुष्य

आहे एकमेकांच्या साथीनं

म्हणून प्रेमभावना व्यक्त केल्या

थरथरत्या ओठानं


दोघांच्याही मनातील प्रेमभावना

उत्कट झाल्या

मग मात्र डोळ्यातून आसवांच्या

धारा वाहू लागल्या


आता गाठ बांधायची आहे सुखी संसाराची

एकत्र यायचं आहे आयुष्यभरासाठी

आणि ग्वाही द्यायची आहे तिला

तू माझीच आहेस सात-जन्मासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance