STORYMIRROR

अभिजीत मस्कर

Tragedy

4  

अभिजीत मस्कर

Tragedy

बळी राजा

बळी राजा

1 min
651

काळ्या काळ्या रानामधी

सोन्यावानी पिकं आलं

बैलगाडी भरून सुगीला

धान्य घराकडं आलं


बाजारामधी न्हाय भाव त्याला

रात्रंदिस राबून फळ नाही कष्टाला

घोर लागून राही जीवाला

लावून घेतो फास गळ्याला


निसर्ग पण पाठ फिरवतोय

नाही पाऊस वेळेवर

सरकार मात्र पॅकेज देतंय

आमचा जीव गेल्यावर


हात जोडून सांगतो तुम्हाला

योग्य भाव द्या शेतमालाला

नाहीतर जगाचा पोशिंदा

उरलं फक्त नावाला


जगाची भूक भागवणारा

तोच आज उपाशी झोपतोय

बँकेचे हफ्ते फेडण्यासाठी

लाचार होऊन कर्जमाफी मागतोय


खरंतर भीक नकोय कोणाची

साथ आहे काळ्या मातीची

सोन्यावाणी पीक काढीन कष्टानं

पण जगणार नाही लाचारीने


मुलाच्या कॉलेज ची फी भरायला

जमीन आमची विकायची

अन सरकारी नोकरी करणार

पोर बड्या बापाची


विनंती आहे सरकारला

विसरू नको अन्नदात्याला

न्याय हवाय बळीराजा ला

जगाच्या पोशिंद्याला


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Tragedy