आयुष्यावर बोलू काही
आयुष्यावर बोलू काही
शब्दांची धार माझ्यालेखणीतून जाणवत होती
आयुष्यावर बोलू काही चाअर्थ उमगत होती !!१!!
शाईरूपी रक्तातून शब्दकागदावर अलवार उतरले
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर अलगद विसावले !! २!!
जीवनाच्या वाटेवर अनेक वाटसरू भेटले !!
आयुष्यावर बोलू काही म्हणता सगळे पांगावले !!३ !!
रात्रीच्या गर्भाला घाबरून आयुष्याची वाट बदलली
उद्याचा उषःकाल होता जीवनाची रूपरेषा कळली !! ४ !!
जीवनातले सर्व काही संपले तेंव्हा कळले हास्य माझे उरले
आयुष्यावर बोलू काही म्हणता जीवन माझे सरले !! ५ !!
आयुष्याचा अर्थ मला कळलामागे वळून पाहताना
जगावं लागलं वर्तमानात आयुष्यावर बोलताना !! ६ !!
वादळवाऱ्याला तोंड देत आयुष्याची नौका हाकत होते
आयुष्यावर काही बोलत समाधान त्यात मानत होते !! ७ !!
