स्त्री भ्रूण हत्या
स्त्री भ्रूण हत्या


सर्वांची इच्छा
मुलगा हवा
कशाला तर
वंशाला दिवा
स्त्रीभ्रूण हत्या
पाप महान
धजावतेच
कसे हे मन
काहो मारता
मुली गर्भात
सांगाल काय
तिथे स्वर्गात
सर्वांनी दिला
जन्म मुलाला
मिळेल सून
कशी तुम्हाला
माराल गर्भी
स्त्रीच्या भ्रूणाला
आणाल कसा
दिवा वंशाला