हिंगणघाट जळीत हत्याकांड
हिंगणघाट जळीत हत्याकांड
भ्याड हल्ले खूप झाले
आता तरी माज सोड
घृणतेची सीमा गाठलीस
अन माणूसकीशी काडीमोड
माते उदरी जन्म घेतोस
शेवटी जाणार मातीत तू
तरी तिचीच विटम्बना
शूद्र विचार डोक्यात धोंड
तिच्या जळत्या पदराआड
तुझी निच नीती मरते
तरी तुला लाज नाही
मात्र तिच्या अंगभर फोड
अरे जरा माणसात ये
खरं पौरुषत्व सिद्ध कर
अंतरातला अहं जाळ
अन्यायाला वाचा फोड