पीकपाणी
पीकपाणी
1 min
173
मृग नक्षत्र पावले
काळीआई सुखावली
झळा उन्हाच्या आटल्या
येता ढगाळ सावली
निळ्या मंडपाच्या खाली
ल्याली हिरवी पैठणी
नवी नवरी नटते
तशी सजली धरणी
अंग घामानं भिजवी
डोळा स्वप्न दिनराती
माय राबते शेतात
बाप पिकवतो मोती
अगा पांडुरंगा धाव
तुझ्या लेकरांना पाव
निढळल्या घामासाठी
मिळो समाधानी भाव.
