उद्रेक भावनांचा
उद्रेक भावनांचा


छळतोय कैक वेळा उद्रेक भावनांचा
वाटा अनंत काढी हा पूर लोचनांचा
दाटून कंठ आला नि अंगावरी शहारे
उल्लेख आज झाला प्राणप्रिय साजणाचा
स्वप्नात घे मिठीत, जरी सत्यात दूरदेशी
हृदयात दिनराती, अंगार आठवांचा
वाटेत एकटी मी, एकांत सोबतीला
हातात हात घे अन् हो सारथी रथाचा