च्यारी दिवे सारखे..
च्यारी दिवे सारखे..
खोट्याच्या जिभेला मोठा फोड
खऱ्याच्या वाटेला कांद्याची फोड
बोल नाय खोटे माझे, करतोय झोल
दिखावा असा की पवित्र पाणी
मन नाही स्थिर याची भलतीच कहाणी..
सांगतो चार दिवस सारखे
पापाने भरले यांचे मडके
चोर, चोर करून साव झाले गोळा
पंचानी पकडला निष्पापी भोळा
शिक्षा ठरणार यांची या वर..
हा भगवा, हिरवा की निळा.
खोट्याच्या जिभेला मोठा फोड
खऱ्याच्या वाटेला कांद्याची फोड
बोल नाय खोटे करतोय झोल
किती ही लिहिले तरी त्याला नाही मोल...
खोट्याच्या वाटेला बटाट्याची साल...
गरिबाचे मोठे होतायत हाल..
टॅक्स टँक्स करून,
सावकाराला लुबाडून खाल.
बोकांडी आलं सार.
मलिया बरॊबर फिरायला झालं
बोल नाय खोटे माझे करतोय झोल
