स्त्रीत्वं हाच गुन्हा?
स्त्रीत्वं हाच गुन्हा?
अष्टाक्षरी
अनंतशा कालौघात
तिचं दुःख वाहतंय
कधी थोडं सुकतंय
कधी भळभळतंय(1)
पैसे, फ्लॅट, सोनंनाणं
अरेरावी मागणीची
काय करावं उमजेना
मनी धास्ती अखंडचि(2)
गुंड, मवाली, रोमिओ
एकतर्फी प्रेम करी
प्रतिसाद नाकारता
आम्ल फेके तोंडावरी (3)
मिळवती असूनही
हुकूमत तिच्यावर
काही विरुद्ध बोलता
हात टाकी तिच्यावर (4)
माझं स्त्रीत्वं हाच गुन्हा?
कधी खरी समानता?
मनी विचारांचा गुंता
कुणी उत्तर सांगता? (5)
