आक्रोश
आक्रोश
त्या अमानुष अत्याचारी हैवानाची टोळी बिनबोभाट सैरावैरा भटकताना जेव्हा मला दिसते...
तेव्हा मात्र मला माणूसकीच्या चिंधड्या चिंधड्या झाल्यासारखे वाटते.....
सांगा, कुणी ऐकल्या होत्या
त्या भयान शांततेतील किंकाळ्या ?
अन कुणी पाहिली होती अब्रुचे लचके तोडणार्या त्या नराधमांची काळी तोंडं ?
फोटो काढले, बातम्या झाल्या,
चहाच्या घोटाबरोबर अंतर्मनात घुसल्या
पण पुढे काय ?
त्या तशाच सागरी लाटांप्रमाणे काळजावर आदळत राहिल्या....
अन पुन्हा शांत झाल्या.....!
पण ती शांत
झाली नाही
वार्यासारखी सैरभैर होवून
न्यायासाठी धायमोकलून कोसळत होती...
काळ्या कोटालाही माणूसकीची कीव येत नव्हती...!
सारं सगळ्यांचं पूर्ववत सुरु झालं
त्या काळजाचं जगणं
जीवाच्या आकांताने फडफडणार्या पाखरासारखं झालं...!
कधी शांत होणार हा हंबरडा?
कधी शांत होणार ह्या किंकाळ्या?
कधी क्षमणार ह्या वेदना?
कधी थांबतील ह्या आरोळ्या?
पुन्हा दुसर्या क्षणाला तीची
अब्रु लुटली जाणार
अन आम्ही मात्र चहाच्या फुरक्यासोबत तीची बातमी उडवणार....!