STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

3  

Umesh Dhaske

Abstract

रक्तातली २६ जानेवारी

रक्तातली २६ जानेवारी

1 min
164


महामारी कोरोनाची

जगा भेडसावत आहे

कुठे आमच्या रक्तात आज

२६ जानेवारी दिसत आहे ?


अश्लिलतेच्या वासनेचे

डोळे विस्फारून

अबलेचे लचके तोडत आहे

रक्ताचाही काळाबाजार माझ्या देशात होत आहे


न्यायासाठी वणवण अन

गुन्हेगार मोकाट आहे

कुठे......?


डॉक्टरांच्या सेवेला 

असतीलही अपवाद काही

रुग्णालाच जीवे मारणारी

ही काही सेवा नाही


अवयवांचा बाजार

उघड्या डोळी होत आहे

कुठे..?


देश घडविण्या क्रांतीच्या

लाखो मशाली पेटल्या होत्या

लाज कुठे अन भ्रष्टाचार

शब्द जुन्यांना नवाच होता


फासावरच्या प्रेतांची सरणं क्षणाक्षणाला पेटत 

आहे

कुठे?


मातीमधूनी मोती पिकवती 

अशी माणूसकीची नाळ होती

देशासाठी जगणं अन मरण्याची ती आण होती


आता ही माती विकण्यालाही

माणूस पुढे सरसावत आहे

कुठे?


व्यसनाधिनता पुरुष स्रियांनी

हद्दपार आज केली आहे

भारतभूमी कशी हो हसणार ?

धाय मोकलून ती रडते आहे


जातीयता अन धर्मतेढीत

माणूस आज गुंतला आहे

कुठे....?


वीर जवान आमुचे तैनात

देशसेवेसाठी

सदैव तत्पर बलिदाना अन

सदैव लढण्यासाठी


शहीदांचे स्मरण नुसते

देशसणालाच का आहे?

कुठे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract