STORYMIRROR

Ajinkya Jadhav

Abstract Crime

3  

Ajinkya Jadhav

Abstract Crime

दगडाने लिहिलेली कविता

दगडाने लिहिलेली कविता

1 min
201

या दगडांनो .....कविता वाचू या ....

या दगडाने लिहिलेली 

आणखी एका निर्भयाची कथा ऐकू या....

मनं आहेत आपली मेलेली ....

सवय आहे देशाला ...बलात्काराची ....

रोजच्या बातम्यांची ......बातमी वाचून 

चुकचुकत राहणाऱ्या दगडी माणसांची .....

प्रशासन अपात्र ठरते ....कायदा हरतो ....

जिथे न्याय नाही .... त्याची भीती नाही ....

तो आहे या भ्रमात, ती मात्र जिंकत नाही .....

हि राक्षसी पैदास .....सर्वांना ठाव आहे ....

कायदा मागून घसे थकले .......

निष्क्रिय सरकार आहे ..........

न्याय मागेल म्हणून जीभ कापली .....

न्यायासाठी तडफडली ....ओरडली .....

गेल्यानंतर कळू नये .....म्हणून 

लपून खाकीने अग्नी दिली .....

न्यायमूर्ती तू तरी जपून रहा .....

तुझ्या पहाऱ्यात .....


रक्षक हे सारे पिशाच्छ आहेत .....

क्रांती विझली ...मोर्चे संपले ......

चौथ्या स्तंभाचे फक्त चिंध्या उरले ......

जमले तर मागू न्याय? ...नाहीतर 

पुढच्या निर्भयाच्या हि लागतील हाय .....?

चला दोन दिवस रडू या .....गेली ती स्टार नाही 

म्हणून थोडंच बोलू या ..........

आपण मात्र दगडच राहू ........

पुढची हि निर्भया पाहू .....थोडे घाबरून 

आशा करू ...ती तुमच्या आमच्या घरातली नसेल .....

आणि जर असेल तर तुमच्या आमच्या दगडी देहात ...

खरंच प्राण असेल ............?

आज सीता पुन्हा संपली .......राम साक्ष असून ....

ती चितेवरही हरली ........

संपवतो कविता .....दगडांनो ......

दगडाची ऐकलात कविता ......

आभार .....

चुकून आला प्राण दगडात .....

तर जपा थोड़...........जीवास

उपयोग होईल त्याचा ......

पुन्हा माणूस होण्यास ..........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract