बापडी
बापडी


पाटी दप्तर अडकवलं पाठीला
बापडी चालली शाळा शिकायला
अ आ इ गिरवायला.
शाळेत जायचं मोठं व्हायचं
पोरीला मातुर बॅरिस्टर करायचं
देशासाठी लढत लढत मरायचं
हे सपान तिच्या आईचं.
फडक्यात बांधून भाकर मिरचा
संगतीला तो कांदा घ्यायचा
मधल्या सुट्टीत चवीनं खायचा.
घंटा वाजली शाळा सुटली
घरच्या ओढीन वाटन चालली
तोवरच बापडी वर झडप घातली
कोवळी कळी तोडून टाकली.
वासना झाली पापी नराधमांना
चुरगळून टाकले कोवळ्या जीवाला
आय आय ओरडली चिमुरडी
कोमल पोर आईची बापडी.
आयाची ती वंशाची पणती
आईन हंबरडा फोडला धरणीवरती
बापडी ची प्राणज्योत मावळली होती.
अंगावरचा फ्रॉक फाटला होता
बापडी रक्तात माखली होती.