STORYMIRROR

Rajashri Sutar

Romance Inspirational

4  

Rajashri Sutar

Romance Inspirational

राजसा

राजसा

1 min
313

ओवाळीते प्राणज्योती ने

तिलक लाविते राजसा

तुला माझ्या लाल रक्ताने

शूरवीर राजसां जा

माय भूमीला वंदन कर रणांगणावरी

हाती शस्त्र घेऊनी

स्वार हो शत्रूवरी

विजयी हो युद्धभूमीवरी

वाट पाहीन तुझी जन्मभर

भालीच लाल कुंकू माझं

रक्षण करेल तुझ जन्मभर

तुझा निरोप देता

अश्रुने पापण्यांचा बांध फुटला

भरजरी पैठणीचा शेव तो भिजला

आतुरलेले नयन ते

तुझी वाट पहाण्याला

गळ्यातले पवित्र मंगळसूत्र

यश देईल रे लढण्यात तुजला

दिसा मागून दिस जातील

परी विजयी होऊ न ये राजसा

अबलांना न्याय मिळवून दे

विचार करू नको स्वार्थाचा

तर विचार कर काळ्या आईचा

राजसा जा शूरवीरा च्या पावलाने

शत्रूवर लढून जा

आपल्या शिवरायां प्रमाणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance