भिमाईच्या सुता
भिमाईच्या सुता


भिमाईच्या सुता तुला बुद्धांचे वरदान
आम्हासाठी भीम भक्ताला पाठविलं बुद्धानं
दिव्य तुझी बुद्ध भक्ती भव्य तुझी माया
बालपणी गेलासी तू ज्ञानासी गिळाया
झुकली सारी दुनिया लाजवले आसमान
आम्हासाठी भीम भक्ताला पाठविलं बुद्धानं
शापितांच्या न्यायासाठी झिजवलेस स्वतःला
शापित जीवन पवित्र करुनी दिलेस तू आम्हाला
उपवासी स्वतः राहिले परी न्याय दिला मिळवून
आम्हासाठी भीम भक्ताला पाठविलं बुद्धानं
धन्य तुझी विचारशक्ती धन्य तुझी सेवा
तुझी आम्ही लेकुरे सारे वनवासी का रे देवा
जय भिम जय भिम बोला कंठाशी आले प्राण
आम्हासाठी भीम भक्ताला पाठविलं बुद्धानं
>
हार तुला कमलपुष्पांचा शारदेने घातला
पुष्प मालेतूनिया ज्ञानाचा सुगंध सुटला
जनसेवेपुढे स्वतःचे नव्हते भान
आम्हासाठी भीम भक्ताला पाठविलं बुद्धानं
आले किती गेले किती केला अज्ञानाचा हेका
परी वाजविलासी तेथे ज्ञानाचा तू डंका
झुकली सारी दुनिया लाजविले आसमान
आम्हासाठी भीम भक्ताला पाठविलं बुद्धानं
6 डिसेंबर 1956 ला कैवारी आमचा झोपला
झोपला तो पुन्हा कधी बाप्पा नाही उठला
पोरकं आम्हाला करूनी काई वाऱ्याला नेलं ईश्वरानं
आम्हासाठी भीम भक्तांला पाठविलं बुद्धानं
भिमाईच्या सुता तुला बुद्धांचं वरदान
आम्हासाठी भीम भक्ताला पाठवलं बुद्धानं