STORYMIRROR

Rajashri Sutar

Tragedy

3  

Rajashri Sutar

Tragedy

भिकारीण

भिकारीण

1 min
79

लाल कुंकू भाळावरी

फटकाच पदर डोईवरी

त्याच्या सतरा गाठी

सहावारी निऱ्याचा घोळ सावरी

परी त्याचा दोबळा येई पोटावरी

घामाने चिंब होता पदर

फड कोणी तो सुकवी वाऱ्यावर

तंग चोळीची गाठ ती

येई तिच्या काळजावर

फाटका परी नेटका मायेला

त्यानेच पाठीवरी बांधूनी लेकराला

डोईवरी घेवुनी गाठोड याला

चटके घेत झपाझप

चालवी अनवानी पावलाला

जीवाची सखी काठी त्या

खाचखळगच्या मार्गात आधाराला

बोरी बाबळीच्या गर्द छायेत बसुनी

तिच्या घडातले अमृत चाखूनी

गोंडस बाळ पहाते टकमक पदरातुनी

अश्रू येतात त्याच्या कोमल नयनातूनी

का पाठवले या स्वार्थी दुनि येत

ईश्वरा तू स्वर्गा तुनी

जग मुकले आता माणुसकीला 

भाकरीचा तुकडा सुद्धा कोणी

देत नाहीत माझ्या गरीब आईला


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy