वेदना (शोकगीत)
वेदना (शोकगीत)
#SMboss#Task3
गर्भात उमगताच बाळाची चाहूल,
माता पिताचे जडती नाळीशी गोड नाते..
पाळणा हलणार ह्या आनंदाने,
गुंजन होते घरातल्या दाही दिशांचे...
नऊ महिने नऊ दिवस,
गर्भवतीचे खाण्या पिण्याचे लाड,
बाळाची लाळ गळू नये,
म्हणून डोहाळे जेवणाचा अट्टहास...
इवलीशी पाऊले घरी येताच,
लक्ष्मीपूजन होते साजरी,
बदलत्या काळात माता पिताच,
अर्ध आयुष्य मुलीच्या चिंतेत वाहती..
कारण जेव्हा निरपराध मुलीवर,
नराधम करतात सामूहिक बलात्कार..
तेव्हा जखमी शरीरासोबत,
वार होतो मुलीच्या संपूर्ण आयुष्यावर..
पोटच्या गोळ्याची,
हीनदीन अवस्था पाहताना,
काय होत असेल त्या माता पित्यांची दशा,
मुलीच्या दुःखद वेदना ऐकताना?
