शेतकरी हत्याकांड
शेतकरी हत्याकांड
शेतकरी हत्याकांड ऐकून
येतो काटा अंगावर
अंगात उडतो भडका
टाहो ऐकायला येतो कानावर...!!
कसं चिरडाव वाटलं तुला
गाडीखाली जगाच्या पोशिंद्याला
लाज नाही का वाटली गाढवा
मारलास कष्टकरी शेतक-याला....!!
लखमापूर हत्याकांडाचा
सर्वांनी करावा निषेध
घराघरांतून द्यावा प्रतिसाद
तेंव्हाच लागतील वेध......
मूग गिळून बसणा-या सरकारने
आज काय बेडकीच गिळली का
शेतकऱ्यांचा जीव घेताना
तुझी बोबडी वळली होती का?
खून, बलात्कार,शोषण
इथे दररोज घडतात
खरी बातमी लावली की
न्यूजवालेच बीघडतात....!!
जालियनवाला बाग हत्याकांड
आजवर आम्ही ऐकून होतो
२१ व्या शतकात ही जाणिवपूर्वक
शेतकरी हत्याकांड घडवून येतो...
जगाची नाही तर मनाची तरी
थोडी ठेवायचा होतास लाज
सत्त्तेच्या जोरावर आज
तुमच्यासारख्यानाच चढलाय माज...!!
अजून किती हत्याकांड बघायची
किती फोडायचा टाहो
जगाच्या पोशिंद्याला कधी
न्याय मिळणार का हो.......!!
कुठतरी आता हे थांबले पाहिजे
खरं काय ते जनतेला कळलं पाहिजे
बस्स झाले न्याय,हक्क मागणे
घराघरांतून निषेध झालाच पाहिजे...!!
