सरकारी भाऊ
सरकारी भाऊ
जाऊ तिथे खाऊ
आम्ही सरकारी भाऊ
कुस्करून खाऊ
वरबडून खाऊ
खरडून खाऊ
अडवून खाऊ
पिळून खाऊ
गोड बोलून खाऊ
आम्हाला पाहिजेत भरपूर गाड्या
शाबूत करायचेत पुढच्या पिढ्या
आम्हाला पाहिजेत भरपूर बंगले
त्यावेळेस आम्हाला दिसेल चांगले
आम्हाला पाहिजे भरपूर संपत्ती
विसरलोय आम्ही 'अति तेथे माती'
म्हणूनी नाही आता कोणतीही भीती
पैशाने बिघडल्याय मती
आल्याय कलियुगी गती
लाचेशिवाय जमत नाही आम्हा गड्या
कारण आमच्या बायकांना घ्यायच्यात महागड्या साड्या
आम्हाला माहीत आम्हाला पडणार नाहीत बेेड्या
यंत्रणेच्या अगोदरच लावतो आम्ही काड्या
