ती रात्र फसवून गेली...
ती रात्र फसवून गेली...
ती रात्र फसवूनी गेली
आसवे डोळ्यात उतरवूनी गेली
अब्रुची लत्करे माझ्या वेशीवरी टांगून गेली....!
ती रात्र फसवूनी गेली
देह हा नासवूनी गेली
टाहो ऐकताना माझा
ती रात्र गाढ झोपून गेली.....
ती रात्र फसवूनी गेली
आवंढा गिळून गेली
आक्रोश किंकाळ्या माझ्या
वार्यात जिरवून गेली....!
ती रात्र फसवूनी गेली
लाज लुबाडून गेली
घबाड चाटताना
खुशाल हसून गेली....!
ती रात्र फसवूनी गेली
मज अबोल करुन गेली
जात हैवानाची
रात्रीस चिरुन गेली.....!
