STORYMIRROR

Sarita Ramteke

Crime

3  

Sarita Ramteke

Crime

संविधान घराघरात पोहोचत आहे

संविधान घराघरात पोहोचत आहे

1 min
444

विद्रोहाच्या ठिणग्या उठताच

लोकशाही जागी होतांना दिसते


चिरेबंदी वाड्यातल्या अभेद भिंतींना

भेदून मिश्र वस्त्यात शिरते .....

समता प्रस्थापित करण्यासाठी


पण,

व्यवस्था तिथेही तग धरूनच असते

डावपेच करण्यासाठी


मग जाळपोळ, लुटालूट, नरसंहार ....

वेधलं जात दुसरीकडे लक्ष

व्यवस्थेवर पांघरूण घालण्यासाठी

छाटून टाकतात लोकशाहीचे बळकट होणारे हात


अंशतःहा पंगू होण्यासाठी

अन ,सुरू होते मुस्कटदाबी

पण, लोकशाही अजूनही जिवंत आहे

कारण,

संविधान घराघरात पोहोचत आहे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime