मनुवादाचे झाड
मनुवादाचे झाड
उग्र रूप धारण करतोय
बलात्काराचा वाढता धोका
लेकीबाळींना सांभाळून आता
पाशवी वृत्तीना वेळीच ठेचा (ठोका)
आज लेक आमची तर
उद्या तुमचीही असणार आहे
अस्त्र शस्त्र उगरून मग
मानवतेचा बळी जाणार आहे
युद्धाने युद्ध पेटत राहील
संघर्षाची ठिणगी उठत राहील
बुद्धाच्या या पावन भूमीवर
रक्तरंजित क्रांती घडत राहील
गर्वाने सांगतोय आपण
माझा देश महान आहे
रात्रीच्या किर्रर्र अंधारात मात्र
कोण्या लेकीचे सरण जळत आहे
जिजाऊंनी इतिहास घडविला
शिवरायांनी स्वराज्य निर्मीयले
महाराष्ट्राच्या या भूमीवर
स्त्री जातींना संरक्षण दिले
आता आम्हास ,
संविधानाची ...
स्वातंत्र्य, समता बंधुत्वाची बीजे
या मातीत घट्ट रुजवायचे आहे
मनुवादाची झाडं आता
मुळासकट उपटायचे आहे
मनुवादाचे झाडं आता
मुळासकट उपटायचे आहे .....
