कविता
कविता
1 min
279
जगाच्या या पाठीवर
पवित्र नाते मैत्रीचे
दोन शब्द तुझ्यासाठी
लाख लाख ग मोलाचे
शब्द तुझे माझे गीत
मनी सदा वसेे प्रीत
दुःख यातना काटेरी
असे जगाची ही रीत
झाडावर बहरतो
जसा काटेरी गुलाब
स्पर्श त्याचा मखमली
जणू वाटे तो रुबाब
विखुरल्या त्या पाकळ्या
तरी गंध चहुकडे
मनाच्या या कुपीमध्ये
आनंदी आनंद गडे
दोन शब्द तुझ्यासाठी
दोन शब्द माझ्यासाठी
मैत्रीच्या या वाटेवर
सायंकाळ अश्रूंसाठी
