कविता
कविता
1 min
354
संविधान आमच्या वस्तीत आलेच नाही
काळ्याकुट्ट गडद झालेल्या अंधारात
वस्ती जळत होती
वेदनेने विव्हळत होती
अंगावरल्या खपल्यांनी
काया तडफडत होती
सोबत वेदना आणि विद्रोहाचं
अजब शस्त्र...
डोळ्यात आग,
पोटात भूक घेऊन....
मानवी समाज
उभं करण्याचं स्वप्न पाहणारा,
जगणारा
शोषित,
पीडित,
वंचित समाज
आजही म्हणतोय
संविधान आमच्या वस्तीत आलेच नाही?
