STORYMIRROR

Rohit Khamkar

Crime Others

3  

Rohit Khamkar

Crime Others

भोग

भोग

1 min
361

अंधकार झाला आता, जनावरा जाग आली.

आया बहीणीणो सांभाळून वागा, वैरी रात्र झाली.


शिक्षा झाली छोटी, आणी गुन्हा झाला महान.

पिडितेला शाप लागला, शांत झाले सगळे कान.


झाला सोहळा काही दिवस, सगळेच असे संतापले.

काळ लोटला सारं विसरले, आरोपीही आता सुखावले.


करूनी पश्चाताप झाले मोकळे, मागत आहे माफी.

शिक्षा थोडी कमी करावी, म्हणून सारी धडपड काफी.


आता सुधारू सारं काही, जगू नव्याने पुन्हा.

पीडिता बाकी मारुनी उरली, नवा जन्म फक्त तुला.


चुकला तु सुधारला तु, नव्याने जगणारही तु.

भोग भोगणारी आता संपली, सांत्वनही आता करशील तु.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime