हुंडा
हुंडा
मुलीच्या आयुष्यातलं सुंदर स्वप्न,
अधूरंचं राहून जातं
हुंडया च्या अटटाहासापायी,
तिचं जीवन उदवस्थ होऊन जातं
हुंडया च्या प्रथेमुळे,
बापं अर्धा मरून जातो
मुलीच्या सुखासाठी हुंडा जमवताना,
तो पुरता झिजून जातो
आयुष्यभराचे सारे धन,
मुलीसाठी तो देऊन जातो
मानपान करता करता,
प्रसंगी अपमान सहन करून जातो
मुलीचा संसार उभारताना,
बापाचे घर मोडून जाते
तरीही हुंडयासाठी सुंनांचे,
कित्येक घरांत बळी जाते
अन्यायी या अशा प्रथेविरोधी,
बंड आता पुकारायला हवे
हुंडयासाठी बाप लेकींचे चाललेले बळी,
आता कुठेतरी थांबावायला हवे
