जीवन
जीवन
हसतां हसतां थोडं,
रडतां ही यावं
सुखाबरोबर थोडं,
दुःख ही झेलता यावं
यशाबरोबर कधीतरी,
अपयश ही चाखता यावं
सावलीतं बसण्यापेक्षा,
कधीतरी उन्हांतं फिरांवं
जीवनातं कधीतरी,
असंही जगतां यावं
जगासमोर एक,
आदर्श होता यावं
