STORYMIRROR

Rutuja kulkarni

Fantasy

3  

Rutuja kulkarni

Fantasy

वेडी रात्र

वेडी रात्र

1 min
994

किती उलटून गेली वेळ 

शहर काळोखात विसावले आहे

आणि जवळपास आता रात्र अर्धी होतं आहे 

तरीही या पापण्यांची उघडझाप काही केल्या थांबत नाही

हे असेच होते माझे नेहमी

रात्र जसजशी जवळ येते तसतशी माझी झोप माझ्याशी लपंडाव खेळते

आणि मगं कुठल्याशा जुन्या आठवणींचा 

हे मन पसारा मांडून बसते आणि त्या चंद्राला ही एक एक गोष्ट सांगत बसते

तो चंद्र ही अबोल राहून सारं काही ऐकून घेतो

आणि या एकट्या रात्रीत कदाचित आठवणीत मी हरवून जाऊ नये म्हणून

मला रात्र रात्र सोबत करतं बसतो

हा चंद्र ही वेडा आहे की ही रात्र वेडी आहे

मला नाही माहितं

पण माझ्या आयुष्यात आलेली ही प्रत्येक वेडी रात्र मात्र खूप खास आहे 

आणि मी चंद्रासोबत जागवलेला तो प्रत्येक क्षण

त्या चंद्रासारखाचं खूप विलोभनीय आहे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy