STORYMIRROR

Shubham Gawade Jadhav

Fantasy Others

3  

Shubham Gawade Jadhav

Fantasy Others

माझा बाबा

माझा बाबा

1 min
193

बाबा बाबा

मला माफ कर

तुझ्या छकुलीचा

मायेने हात धर


पुन्हा मी असं

नाही करणार

आईला त्रास

नाही देणार


नको ना माझ्यावरती

असा तू रुसू

नाराज होऊन

कोपऱ्यात बसू


नको धरूस तू

असा अबोला

चल दोघे मिळून

खाऊयात बर्फाचा गोळा


तू रुसल्यावर माझा

लाड पुरवणार कोण?

मायेने कुरवाळून

पाठकुळीवर घेणारी कोण ?


तुझ्या खांद्यावरती बसून

मला पाहायचाय जग

हाताने आकाशातले

पकडायचेत ढग


आकाशाला घालायची

क्षणात गवसणी

तू सोबत असताना करायची

इंद्रधनुष्याची पायपुसनी


एकदिवस लग्न करून

जाईल दुसऱ्याच्या घरी

सारखी सारखी नाही

दिसणार तुझी लडकी परी


बाबा आता तू

थोडा तरी हसना

माझ्याशी गोड गोड

गप्पा मारत बस ना 


Rate this content
Log in

More marathi poem from Shubham Gawade Jadhav

Similar marathi poem from Fantasy